
आपत्ती व्यवस्थापन : काळाची गरज भाग-१
आपात्कालीन परिस्थिती मध्ये प्रभावीपणे समस्यांचे निराकरण करता यावे म्हणून आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज बनलेली आहे .
लोकसंख्या घनता , सुखसाधनांची रेलचेल व गतीमान जीवनपद्धती मध्ये आणिबाणी किंवा आपत्ती कमी जास्त तिव्रतेत सतत अनुभवायला येते आहे . अशा अडचणी वा व्यत्ययाच्या स्थितीमध्ये जीवनगती पुर्ववत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज ठरते .
येथे काही प्रश्न उपस्थित प्रश्न जसे आपत्ती किंवा आपात्कालीन स्थिती म्हणजे काय ? त्याचे कारण, प्रकार , काय आहेत ? व्यावस्थापन काय ? याचे निराकरण कसे करावे ? वैगेरे वैगेरे . या सर्व बाबी लक्षात येईल अशा शब्दांत आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज भाग १ मध्ये पाहूयात .
आपत्ती व्यवस्थापन हा विषय सध्याच्या काळात फारच महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळी लोकसंख्या कमी होती . सुख साधनांची रेलचेल नव्हती पण आजच्या सारखी जोखीम म्हणजे आपत्तींचे धोके नगण्य होते. आजच्या विकासाच्या प्रगतीच्या धकाधकीच्या गडबडीत जोखीमिची संभावना जास्त आहे. या आपत्तींच्या शक्यता कोणत्या प्रकारच्या व कशा स्वरूपाच्या असू शकतात याची सविस्तर माहिती पुढील काही भागात घेऊयात. आपत्ती व्यवस्थापन या विषयी सर्वजण ज्ञात असावे कारण या विषयी चे अज्ञान फार घातक ठरत आहे. जीवित हानी असेल किंवा भौतिक स्तरावरची हानी असेल याला आपत्ती व्यवस्थापन विषयीची अनभिज्ञता आहे. या बाबत जनजाग्रती व्हावी त्यातल्या त्यात ग्रामीण भागात संसाधनांची उपलब्धता कमी असते मात्र जोखीमांची संभावना जास्त आहे म्हणून या लेखाचे प्रयोजन आहे.
आपत्ती ची व्याख्या
अचानक निर्माण झालेली एक अशी अनपेक्षित परिस्थिती की जी एक अथवा अनेकांच्या सुव्यवस्था बिघडवते अथवा सुरक्षिततेला धोका निर्माण करते ती म्हणजे आपत्ती वा आपात्कालीन स्थिती होय .
आपत्ती वा धोके सर्वत्र निर्माण होत असतात, मात्र आपात्कालीन परिस्थिती तुलनेने कमी तिव्र असतात ज्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सुविधा व साधनांनी यशस्वीरित्या त्यांचे निरसन केले जाऊ शकते .
आपत्तीचे परीणाम
- जीवितहानी – आपत्ती मुळे मानवी जीवितहानी लहान मोठ्या प्रमाणात आपत्तीच्या प्रकार व स्वरूपावर अवलंबून असते.
- मालमत्तेचे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान – आपत्तीच्या प्रकार व स्वरूपावरून मालमत्ता व रस्ते पूल घरे आदी पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ शकते.
- उपजीविकेचे नुकसान – उपजीविकेचे साधने जसे शेती, वाहने, दुकाने इत्यादी गोष्टींचे पण नुकसान संभवते.
- आर्थिक नुकसान – अशा स्थितीमुळे आर्थिक नुकसान ओघाने होतेच.
- पर्यावरणीय नुकसान – वनस्पती आणि प्राणी – आपत्ती च्या प्रकारा व स्वरूपावरून पर्यावरणातील जंगल आणि वन्यप्राणी हे नाश पावले जाऊ शकतात.
- समाजशास्त्रीय आणि मानसिक परिणाम – आपदांचा प्रभाव समाजावर व मानसिक दृष्ट्या पडतोच यात दुमत नाही उदा. जपान मधील हिरोशिमा व नागासाकी.
व्यवस्थापनाची गरज
मग या आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीला कसे हाताळायचे किंवा या स्थिती चा सामना कसा करावयाचा याच्यासाठी केलेली उपाय योजना म्हणजेच आपत्ती व्यावस्थापन होय.

आपत्तींचे प्रकार
येथे आपदांचे सर्व प्रकार पहातांना प्रामुख्याने आपण भारतातील आपत्ती वा आपदा काय काय असतात याला जास्त प्राधान्याने लक्षात घेऊ .
तसे पहाता आपतींची वर्गवारी मुख्य तीन भागात होते .
- नैसर्गिक आपत्ती
- मानव निर्मित आपत्ती
- इतर ( मिश्रीत ) आपत्ती वैद्यकिय, श्वापदांचा धोका इत्यादी .
नैसर्गिक आपत्ती
- भुकंप (किल्लारी १९९३ , गुजरात २००१ )
- त्सुनामी ( २००४ हिंदी महासागर )
- चक्रिवादळे / वादळे ( १९७० भोला चक्रीवादळ; १९९९ ओडीसा सायक्लोन; २०१९ फानी; २०२० अम्फान, निसर्ग , निवार , बुरेवी; २०२१ तौक्ते.)
- पुर (१९७० नर्मदा पूर )
- वणवा / आग
- ज्वालामुखी (अंदमान निकोबार बेट)
- आकाशातील वीज (२०२१ बिहार)
- दुष्काळ (१८७६-१८७८ सर्वात जास्त जीवित हानी झालेला दुष्काळ )
- भुस्खलन / हिमस्खलन ( २०१४ माळीण गाव पुणे महाराष्ट्र; २०१८ केरळ , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , तामेंगलाँग-मणिपूर, कालीखोला, मणिपूर .)
- दलदल व धरण फुटणे ( १९७९ गुजरात माचू धरणफुटी )
- खाण कामातील दुर्घटना ( डिसेंबर१९७५ चासनळा खाण दुर्घटना, झारखंड )
- शीत लहर (डिसेंबर २०२४ उणे सहा अंश विक्रमी कमी तापमान.उत्तर भारत )
- उष्ण लहर ( मी २०२४ जवळपास संपूर्ण देश )
- गारपीट ( ३० एप्रिल १८८८ मुरादाबाद उत्तर प्रदेश.)
- ढगफुटी ( जून २०१३ केदारनाथ घटना; ऑगस्ट२०२५ उत्तरकाशी ढगफुटी )
- धुके (१५ सप्टेंबर२०११ साओ पाउलो ब्राझील)
मानव निर्मित आपत्ती
- औद्योगिक आपत्ती, (३ डिसेंबर, १९८४ भोपाल वायू गळती, मध्य प्रदेश )
- हवाई / जल / भूमार्ग दुर्घटना (१९८१ रेल्वे अपघात बिहार; १२ नोव्हेंबर १९९६ हवाई दुर्घटना;
- मानव निर्मित प्रदुषण ( युनियन कार्बाईड दुर्घटना भोपाळ MP)
- शहरी पूर ( २००५ मुंबई )
- आग ( २३ डिसेंबर १९९५ दबवली आग दुर्घटना हरियाणा )
- इमारत ढासळणे ( १२ सप्टेंबर १९८३ बंगलोर )
- उत्सव व सणसंबंधित (२०१३ प्रयागराज )
इतर (मिश्रीत) आपत्ती
- वैद्यकिय आपत्ती,
- विचित्र अपघात ,
- युद्धानंतरचे परिणाम इत्यादी ( हिरोशिमा नागासाकी )
- आण्विक (२६ एप्रिल १९८६ चेर्नोबिल अणुभट्टी )
- जैविक /महामारी व साथीचे रोग – ( कॉविड कॉलरा वैगेरे )
- रासायनिक
- विद्युतीय
- कीटकांचे हल्ले – मधमाशी किंवा गांधील माशी.
- जनावरांचे साथरोग – बर्ड फ्लू वा लम्फीसारखे रोग
- अन्न विषबाधा.
- श्वापदांचा धोका . वन्यप्राणी, वाघ, बिबट्या, अस्वल, साप इत्यादी .
आपत्ती व्यवस्थापन चे साधारण स्वरूप
एखादी घटना, मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, अचानक असो वा घडण्याच्या मार्गावर असो, ज्याचा परिणाम इतका तीव्र असतो की प्रभावित समुदायाला अशक्य असलेल्या उपाययोजनांचा अवलंब करून उचित क्रमवारीने प्रतिक्रिया करावी लागते. ही आपत्ती व्यवस्थापन चे स्वरूप दर्शवते.
- आपत्ती पूर्वीची तयारी (खबरदारी)
- आपत्ती दरम्यान हानी टाळण्सायाठी किंवा कमीतकमी हानी साठी करावयाची क्रिया .
- आपत्ती नंतरच्या सर्व शिफारशीत उचित उपाय योजना.
- भविष्यात परत अशी आपत्ती येउच नये त्यासाठी प्रयत्नशीलअसणे.
सध्या या भागात येथे थोडी विश्रांती घेऊया. पुढील येणाऱ्या भागा मध्ये सर्व जोखीमान विषयी जाणून घेऊयात.