गाजलेल्या चपराक व हल्ले.
गाजलेल्या चपराक व हल्ले हा लेख लिहिताना प्रथम येथे हे निक्षुण नमुद करण्यात येते की हा लेख कोठेही व कसल्याही हिंसेचे समर्थन करत नाही .
भारताच्या राजकिय इतिहासात व इतर क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या श्रीमुखात भडकावल्याच्या व हल्याच्या घटना गाजलेल्या आहेत . अशा गाजलेल्या चपराक पाहूयात .
गाजलेल्या चपराक व हल्ले
कालच्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर च्या ६ जुन २०२४ ला मंडी लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत ला विमानतळावर CISF Constable कुलवींदर कौर ने सरळ श्रीमुखात भडकावली . मागे झालेल्या शेतकरी अंदोलनावरील टिप्पणी चा मुद्दा प्रसार माध्यमावर चर्चिला गेला . ही गाजलेली चपराक म्हणावी लागेल.
२४ नोव्हेंबर २०११ NCP चे सर्वेसर्वा व तत्कालीन कृषिमंत्री श्री शरद पवार सार्वजनिक कार्यक्रमावरून येताना महागाई शेतमाल भाव अशा मुद्द्यांवरून ट्रांसपोर्टर हरवींदर सिंग या शीख तरुणाने श्रीमुखात भडकावली .
दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन वेळा श्रीमुखात भडकवण्याचा प्रसंग गुदरला . ४ मे २०१९ व एप्रिल २०१४ च्या इलेक्शन कँपेन च्या वेळेस अनुक्रमे सुरेश चौहाण व लाली सिंग यांनी हल्ला केला . प्रसारमाध्यमाधारे अब्दुल वाहिब मुजफ्फराबाद दंगा व दुसरा मुद्दा लोकपाल बील विषयी होता .
२६ एप्रिल २००९ ला टागोर हॉल मैदान गुजरातला तत्कालिन पंतप्रधान डॉ. श्री मनमोहन सिंग यांच्या भाषणादरम्यान संगणक अभियंता विद्यार्थी असलेल्या हितेश चौहाण याने बुट भिरकावला . सुरक्षा यंत्रणांनी त्या युवकाला ताब्यात घेतले होते पण त्यावर कसलीच कारवाई न करता सोडून देण्या बाबत महामहिम पंतप्रधानांनी संबंधितांना फोन करून सुचवले .
२०१२ ला डेहराडून निवडणूक रॅली मध्ये काँग्रेस नेते श्री राहूल गांधी व २०१० ला स्वातंत्र्य सोहळा प्रसंगी जम्मू काश्मीर चे ओमर अब्दुल्ला यांच्यावरही बुट फेकी ची घटना घडलेली आहे .
२०१४ हरियाणा काँग्रेस CM भूपेन्द्रसिंह हुड्डा यांना बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कमल मखीजा या युवकाने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाला सुरक्षा रक्षकांनी वेळीच हाणून पाडले . १८ मे २०२४ म्हणजे चालू वर्षी च्या लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस नेता श्री कन्हैया कुमार वर दक्ष व अनुकूमार या दोघांनी हल्ला करून शाई फेकली . यात भाजप नेते मनोज तिवारी चे नाव चर्चेत होते . पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले श्री प्रकाश सिंह बादल व माजी दूरसंचारमंत्री राहीलेले सुखराम यांच्यावरही वेगवेगळ्या घटनेत बुट फेकी चा प्रकार घडलेला आहे.
अशा घटनांतील सर्वात कहर हल्ला म्हणावा लागेल ३० जानेवारी १९४८ चा प्रसंग सायंकाळी पाच वाजून १७ मिनिटाला नथुराम गोडसे नामक व्यक्तिकडून महात्मा गांधींना गोळ्या घालून हत्या करवली गेली . सोबत येथे माजी महिला प्रधानमंत्री स्व. श्रीमती इंदिरा गांधी ३१ ऑक्टोंबर १९८४ व माजी प्रधानमंत्री स्व.श्री राजीव गांधी यांची २१ मी १९९१ ची हत्या पण विरोध प्रगट करतांना उचललेलं टोकाचं व असमर्थनीय पाऊल असलेल्या घटनाही उल्लेखनीय आहेत.
गाजलेल्या चपराक व हल्ले यांची कारण मिमांसा
अशा हल्ल्यांचा अर्थ काय होतो ?
एखादया व्यक्तिला किंवा विचारधारेला विरोध दर्शवावयाचा म्हणून हे टोकाचे पाऊल उचलणे कितपत योग्य आहे ?
आता थोडे वेगळ्या बाजूने पाहूयातर .
राजकिय पुढारी असो वा एखादे गाजलेले व्यक्तिमत्त्व असो काही विषयात टिप्पणी करतांना वा बोलतांना थोडा सुज्ञपणा जपायला हवा . कोणतेही वक्तव्य करतांना समाजातील एखादा वर्ग वा घटक विनाकारण दुखावला जाणार नाही किंवा नाराज केला जाणार नाही याचे भान जपावे.
बरीच तथाकथित शिक्षित मंडळी शेती व शेतकरी विषयावर विषयाची पुर्ण माहिती न घेता बेताल वक्तव्य करतांना आढळतात . आताचे कंगना राणावत चे उदाहरण घ्या , काही लोकांना खुश करण्यासाठी शेतकरी आंदोलनाची व्यथा न जाणता बोलणे बेजबाबदारपणा दर्शवते .
श्री शरद पवार यांची कृषीमंत्री असतानाची शेती व शेतकरी विषयक निती इतकी काही सोईची नव्हती . बऱ्याच अंशी शेतीधारीत व्यापारिक धंद्यांना पोसण्यासाठी होती असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही .
महात्मा गांधींवर तर दोनदा हल्ला केला गेला पहिला २० जानेवारी १९४८ व दुसरा हल्ला ३० जानेवारी १९४८ ला सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटाला केला गेला . यात नथुराम गोडसेने ३ फायर करून माहात्माजींना संपवले . येथे नक्किच हा विचार येतो की सर्व जगाने ज्यांना महात्मा पदवी दिली त्यांच्यावर असा प्रसंग का आला असेल ? त्यांची गोळ्या घालून हत्या का व्हावी ? गांधीजींच्या द्वारे विशिष्ट वर्गाचे तूष्टिकरण हे त्यांच्या हत्या चे मुख्य व महत्वाचे कारण होय .