महाकुंभ २०२५

योगी आदित्यनाथ जी

यावेळचा कुंभमेळा प्रयागराज येथे १३ जानेवारी २०२५ म्हणजे आज पासून सुरू होतो आहे . जो कुंभमेळा आहे पुर्णकुंभ आहे व सोबतच महाकुंभ देखिल आहे . थोडी विस्तृतपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात .

इतिहास

कुंभ या शब्दाचा अर्थ कलश असाही होतो . देव दानवांनी समुद्र मंथनाद्वारे १४ रत्न प्राप्त केले या मध्ये अमृत कलश (कुंभ) ही होता ज्याला मिळवण्याच्या झालेल्या प्रयत्नात त्या कलशातील अमृताचा भाग पृथ्वीवर चार ठीकाणी म्हणजे प्रयागराज उज्जैन नाशिक व हरिद्वार येथे पडला . म्हणून विशिष्ट ग्रह स्थितीत चारही ठिकाणी विशिष्ट कालाने कुंभमेळा भरला जातो . ही एक कथा प्रचलित आहे . मात्र विशिष्ट ग्रह स्थितित त्या त्या ठिकाणी स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते अशीही मान्यता आहे .
कुंभमेळा एक असा सोहळा आहे की ज्या मध्ये जंगलातून व विविध भागातून वेगवेगळे पंथ व मान्यता असलेले साधू संत मुनी येतात व तिर्थाच्या ठिकाणी स्नान करतात . यातील काही साधू फक्त कुंभ सोहळ्यातच दिसतात म्हणून पण जगभरातून भाविक तर येतात .
कुंभ सोहळा दरम्यान ठराविक दिवस मुख्य स्नानाचे असतात . यामध्ये विशिष्ट साधू समुहांना प्रथम स्नानाचा मान असतो ज्याला शाही स्नान म्हणतात .

लक्षणिय दिवस दिनांक

या वेळच्या महाकुंभ सोहळ्यातील महत्वाचे दिवस
पौंष पोर्णिमा १३ जानेवारी २०२५
मकर संक्रात १४ जानेवारी २०२५
मौनी अमावस्या २९ जानेवारी २०२५
वसंत पंचमी ३ फेब्रुवारी २०२५
माघी पोर्णिमा १२ फेब्रुवारी २०२५
महा शिवारात्री २६ फेब्रुवारी २०२५

रेडिओ चॅनल कुंभ वाणी १०५.३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top