महाराष्ट्र विधानसभा २०२४
जसे आपण जाणता अहात की हे संपूर्ण वर्ष २०२४ निवडणूकांच्या धामधूमीतच गेले . एप्रिल ते जून लोकसभा निवडणूक चालली . बाकी सर्व वर्ष नोव्हेंबर पर्यंत विविध राज्यातील विधानसभा निवडणुकी चालल्या त्या खालील प्रमाणे .
- आंध्र प्रदेश व ओडिसा १३/०५/ २०२४ मतदान व निकाल – ०४/०६/२०२४
- अरुणाचल प्रदेश व सिक्किम १९ एप्रिल २०२४ व निकाल २ जुन २०२४
- जम्मू काश्मीर १८ सप्टेंबर २0२४ व निकाल – o८ ऑक्टेंबर २०१४
- हरियाणा ०५ ऑक्टोंबर २०२४ व निकाल ०८ ऑक्टोंबर २०२४
- महाराष्ट्र २० नोव्हेंबर २०२४ व निकाल २३ नोव्हेंबर २०२४
- झारखंड १३ नोव्हेंबर २०२४ व निकाल २३ नोव्हेंबर २०२४
वरिल तक्त्या नुसार येणाऱ्या २० नोव्हेंबर ला राज्यात मतदान होत आहे . गत पाच वर्षांत राजकिय घडामोडी फारच नाट्यमयी रीत्या घडत गेल्या . खालिल आकडेवारी सांगते की कोणा एकाला स्पष्ट कौल जनतेने दिलेला नव्हता .
- २६.१ लोकमता सह भाजप १०५ आमदार
- १६.६ लोकमता सह शिवसेना ५६ आमदार
- १६.९ लोकमता सह राष्ट्रवादी ५४ आमदार
- १६.१ लोकमता सह काँग्रेस ४४ आमदार
- १०.१ लोकमता सह अपक्ष १३ आमदार
- १४ .२ लोकमता सह इतर १६ आमदार
अशी आकडेवारी व पदांच्या ओढाताण मुळे कोणत्याही मित्रपक्षांचे सुत एकमेकांशी जुळले नाही . असे असतांना साऱ्या राज्याने पहाटेचा शपथविधी अनुभवला, देशाने पाहिला . परत ही युती न चालल्याने दादा परत स्वगृही आले . परत नाटकिय प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस व सेना ही युती उदयाला आली . परत अंतर्गत धुसपुस कारणीभूत ठरत शिंदे सरकार या राज्याला लाभले हे सर्व घडतांना मतदार राजा नुसते बघत होता . सत्तेसाठी खुर्चीसाठी निष्ठा , नितीमत्ता , समर्पण आदर्श वैगेरे शब्द फक्त शब्दच राहीले .
असो आपण या चालू महाराष्ट्र विधानसभा २०२४ कडे लक्ष वेधूया . या वेळी राज्यातील विधानसभा नोव्हेंबर २०२४ च्या निवडणुकित जवळपास ९ कोटी ६४ लाख 85 हजार ७६५ मतदार राज्यातील सरकार आकाराला आणणार आहेत . यामध्ये १८ ते १९ वयोगटातील २०लाख ९३लाख २०६ युवा मतदार आहेत . ६ लाख ३६हजार २८८ मतदार हे दिव्यांग आहेत . ६ हजार ०३१ तृतीयपंथी व १२लाख ४३हजार १९२ मतदार हे वय वर्षे ८५ च्या वरील आहेत .
मतदानासाठी ओळखपत्र म्हणून आधार UID, पॅन , ड्राईविंग लायसेन्स , मनरेगा जॉबकार्ड सारखे जवळ जवळ १२ प्रकारचे शासकीय विभागाद्वारे दिले जाणारे ओळखपत्र मान्य आहेत .
या वेळी राज्यामध्ये २०१९ च्या तुलनेत ३ हजार ५३३ ने अधिक म्हणजे १लाख १८६ मतदान केंद्रे आहेत .
२२ ऑक्टोंबर २०२४ च्या राजपत्रित अधिसूचनेनुसार उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख होती २९ ऑक्टो २०२४ दिनांक ३० ऑक्टो . छाननी दिवस तर उमेदवारी मागे घेण्याची तारीख होती ४ नोव्हेंबर २०२४ .
आता मतदान दिनांक आहे २० नोव्हेंबर २०२४ व मत मोजणी दिनांक आहे २३ नोव्हेंबर २०२४ . निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार ही निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पुर्ण केली जाईल .