महाराष्ट्र विधानसभा 2019 चे निकाल महाराष्ट्रातील लोकसभा निकालाच्या तुलनेत अनपेक्षित वाटत आहेत प्रत्येक पक्षाच्या विचारधारेला आव्हानात्मक निकाल म्हणावे लागतील सोबतच बऱ्याच न्यूज चॅनलचे व राजकीय भविष्य वक्त्यांचे अंदाज चुकवणारे निकाल आहेत .
महाराष्ट्र विधानसभा 2024 चे निकाल व त्यातील ठळक मुद्दे पाहूया . प्रथम निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारी त्यावर प्रथम दृष्टीक्षेप टाकूयात .
ठळक मुद्दे
मतदार
या विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये राज्यातील जवळजवळ 9.70 करोड मतदारांनी सहभाग घेतला . पैकी,
* पुरुष मतदार ५ करोड मतदार,
* महिला मतदार 4.69 करोड मतदार ,
* तृतीयपंथी 6101 मतदार
* 18 ते 19 वयोगटातील 22.2 लाख मतदार ,
* दिव्यांग 6.41 लाख मतदार व
* 100 पेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील 47 हजार 392 मतदार सहभागी झाले .
मतदान केंद्रे
यावेळी च्या विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये
* ग्रामीण मतदान केंद्र 57 हजार 582,
* शहरी मतदान केंद्रे 42 हजार 604, आदर्श मतदान केंद्रे 633,
* महिला चालत मतदान केंद्र 406 ,
* दिव्यांगचालीत मतदान केंद्रे 274 आणि
* विविध ठिकाणचे 67557 मतदान केंद्रे हे वेब कास्टिंग वर होते .
# आदर्श मतदान केंद्र म्हणजे असे मतदान केंद्र जे की मजबूत इमारतीमध्ये उत्तम रंगरंगोटी केलेले दिव्यांग व वयस्कर मतदारांसाठी सर्व सोयी नियुक्त असे मतदान केंद्र .
## महिला चालीत मतदान केंद्र म्हणजे असे मतदान केंद्र जेथे की सुरक्षा रक्षकापासून सर्व मतदार अधिकारी या महिला असतात .
### असे मतदान केंद्र की जे पुर्णपणे दिव्यांगा मार्फत चालवले जाते .
#### असे मतदान केंद्र की ज्याचे मतदान प्रक्रिया सीसीटीव्ही मार्फत मॉनिटरिंग होत असते .
उमेदवार
राज्यातील 36 जिल्ह्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये
*पुरुष उमेदवार 3771
*महिला उमेदवार 363 आणि
*इतर 2
* एकूण 4136 उमेदवारांनी आपले नशीब अजमावले .
मतदान टक्केवारी
288 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणूक मध्ये राज्यात 65.02% मतदान झाले .
यावेळी सर्वात जास्त मतदान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ७६.२५% झाले
आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहर 52.07% झाले या दोन्ही कोल्हापूर व मुंबई शहर या ठिकाणी प्रत्येकी दहा असेम्ब्ली कॉन्स्टिट्युऐंसिज होत्या .
पक्षांचे संक्षिप्त जाहिरनामे
महायुती जाहिरनामा
* सक्तीच्या धर्मांतरण विरोधात कायदा निर्मिती
* २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दिदि तयार करणार .
* लाडकी बहिण योजनेची रक्कम ₹ १५०० वरून ₹ २१०० करणार .
* महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिला पोलीस दलात समावेश करणार .
* शेतकरी कर्जमाफीसह किसान सम्मान योजनेंतर्गत वर्षाकाठी १२ हजारांवरून १५ हजार ₹ करणार .
* तरुणांना २५ लाख नोकरी निर्मिती .
* १० लाख विद्यार्थांना दरमहा १० हजार विद्यावेतन .
* जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राखणार .
* ग्रामिण भागातील ४५ हजार गावातील पांदण रस्ते बांधणी .
* आंगण वाडी व आशा सेविका मानधन वाढ महिना १५ हजार ₹ व विमा संरक्षण .
* वीजबील ३०% कपात व सौर आणि अक्षय उर्जेवर भर .
* सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांत व्हिजन महाराष्ट्र @ २०२९ सादर करणार .
* शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरीत जी .एस .टी . अनुदान स्वरूपात परत .
वैगेरे ……
म .वि .आ . जाहिरनामा
* महिलांसाठी शक्ती कायदा अंमलबजावणी .
* मासिक पाळीत महिलांना २ दिवस सुट्टी .
* महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना महिना ३००० ₹ .
* सुशिक्षित बेरोजगारांसाठी महिना ४००० ₹
* राज्य सरकारच्या २ .५ लाख जागांसाठी भरती .
* mpsc चे वेळापत्रक जाहीर करून ४५ दिवसांत निकाल .
* संजय गांधी निराधार योजनेद्वारे महिना २ हजार ₹ .
* शीव भोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवणार .
* सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय .
* वर्षाला ६ सिलेंडर ₹ ५०० ने .
* ३०० युनिट वापरणाऱ्यांना १०० युनिट बील माफ .
* शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ .
* सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू .
* सरकारी रुग्णालयांमध्ये औषधी मोफत .
* २५ लाखांची अरोग्य विमा योजना लागू करणार .
वरील दोन्ही जाहिरनामा पहाता केंद्रस्थानी महिला, शेतकरी व युवा हे आढळत आहेत . किंवा यांना आकर्षित करण्यासाठी वरील जाहिरनामे होते .
हे झाले राजकिय पक्षांच्या दृष्टिकोनातून चे निवडणुकीसाठींचे मुद्दे . मात्र खालील मुद्देही लक्षात घेण्यासारखे होते व आहेत .
यंदा CCI कडे (ऐकिवात माहिती वरून) ११ लाख गाठी शिल्लक पडलेल्या असून सुमारे २२ लाख गाठींचा माल भारतात आयात केला जात आहे . परिणामी सध्या तरी नविन कपसाला भाव नसल्याने शेतकरी लवकर कापूस विकण्यासाठी द्विधा मनःस्थितीत दिसत आहे . कारण सोयाबीन बाबतीतही हेच झाले की अपेक्षित भाव मिळाला नाही . इतर शेतमालांचे भाव ही खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नाहीत . खते बीयाणे व औषधी यांची भाववाढ . असे बरेचसे नकारात्मक मुद्दे होते . विरोधी पक्षाने या निवडणुकीत त्यांना उचलून धरले . तरीही महाराष्ट्रातील जनतेने घवघवीत यश महायुतीच्या पारड्यात टाकले .
निकाल आकडेवारी
महायुती २८८ जागांपैकी २३० तर म. वि. आ. ४६ वर वर्चस्व टिकवून आहे .
विश्लेषित निकाल
- १३२ – भाजप
- ५७ – शीवसेना
- ४४ – राष्ट्रवादी काँग्रेस
- २० – शिवसेना उबाठा गट
- १६ – काँग्रेस
- १० – राष्ट्रवादी काँग्रेस श . प . गट
- २ – अपक्ष
- २ – जनसुराजशक्ती
- २ – समाजवादी पार्टी
- ६ – इतर
वरील सर्व मुद्दे व लागलेला निकाल हे दोन्ही परस्पर विरोधी भासतो आहे . न जाणो असे ही असेल की मागिल पंचवार्षिक च्या सरकार स्थापनेत अनैतिक युत्या म्हणजे ज्या दोन पक्षांच्या विचारधारा विरोधात होत्या त्यांनी युती करून सरकार बनवले . नंतर मध्येच पक्ष -फुटी होऊन शिंदे सरकार अस्तित्वात आले . असे राजकिय धक्के राज्याने अनुभवले , म्हणून की काय स्थिर सरकारच्या अपेक्षेने जनतेने भाजप च्या बाजूने कल दिला की काय ?
या निवडणुकीतही धर्माधारीत मुद्दे आढळले . बटेंगे-कटेंगे वैगेरे तसेच ऐकिवात माहिती वरून राज्यभर सर्व पक्षांकडून पाण्यासारखा पैसा वापरला गेला, मात्र याला ठोस आधार नाही . सर्वमान्य आहे पण समोरून कोणी स्विकार करणार नाहीत .
प्रश्नांकित मुद्दे
निकालांच्या आकडेवारीवरून विरोधकांनी
अपेक्षा आहे की भविष्यात लवकरच देशातील मतदान आदर्श निर्माण करेल . ज्या मध्ये धार्मिक मुद्दे नसतील जाती पाती चे मुद्दे नसतील . पक्षांकडून स्वच्छ पाश्वभुमी चे उमेदवार दिले जातील जे फक्त जनतेची सेवा या उद्देशाने प्रेरीत असतील . सध्याची मतदान पद्धती पण आदर्शच आहे मात्र अलिकडे पैसा , धर्म, जाती, प्रांत वैगेरे मुद्द्यांचे प्रमाण वाढलेले आहे .
असो लवकरच महायुतीचे नविन सरकार अस्तित्वात येत आहे . अंदाजे ५ डिसेंबर रोजी शपथविधी अपेक्षित आहे . भाजपचे जास्त आमदार आहेत त्या न्यायाने मुख्यमंत्री भाजप चा असेल यात शंका नाही . देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत . मागिल पंचवार्षिक ला राजकिय धक्क्यां पैकी पहिला धक्का पहाटेच्या शपथविधी च्या रूपाने यांनीच दिला होता . यावेळी नविन चेहरा पुढे करून भाजप परत राज्याला आश्चर्यित करेल काय ?