संपूर्ण भारत वर्षासाठी अभिमानाची बाब व सनातन संस्कृतीची सर्वोच्च सिद्धता वैश्विक ध्यान दिवसाच्या माध्यमातून दिसत आहे .
संयुक्त राष्ट्राने नुकताच २१ डिसेंबर २०२४ जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केलेला आहे व या दिवशी पूर्ण जगामध्ये विश्वविक्रमी संख्येने लोक ध्यान करणार आहेत व यांना मार्गदर्शन करणार आहेत ४३ वर्षांमध्ये १८० पेक्षा जास्त देशात ज्यांनी ध्यान पोचवले ते व्यक्तिविकास केंद्र (आर्ट ऑफ लिंक फाउंडेशनचे संस्थापक ) जागतिक अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर जी .
आपल्या सर्व देशासाठी अभिमानाची बाब आहे की गुरुदेव श्री श्री रविशंकर जी प्रथम ध्यान दिवसाचे मार्गदर्शन करणार आहेत ते न्यूयॉर्क येथून मार्गदर्शन करणार आहेत आजचा दिवस इतिहासामध्ये ठळक अक्षरात नोंदवला जाणार यात शंका नाही काय आपण यामध्ये सक्रिय सहभागी होऊन साक्षी होण्यासाठी नाव नोंदवले आहे ? पुढील संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदवू शकता .
गडगंज संपत्ती असलेले पश्चिमात्य देश जेथे फक्त बोटाच्या द्वारे बटन दाबले की सर्व सुख सुविधा उपलब्ध करून घेणारे गर्भ श्रीमंत यांनी जाणले अनुभवले की सुख समाधान शांती ही साधनांनी नाही तर फक्त साधनेने प्राप्त होते . आज सर्व जग भारताकडून अध्यात्मिक ज्ञानाची अपेक्षा करत आहे . पैसा असुनही अशांतता, अस्वस्थता , गुन्हेगारी व व्यसनाधिनता समाजाला पाशवीपणा कडे घेऊन जात आहे हे विकसित म्हणवून घेणाऱ्या देशांनी ओळखले आहे . या सर्वांवर उत्तम समाधान म्हणजे ध्यान हे जागतिक बुद्धिजीवी वर्गाने ओळखले व त्यासाठीची पाउले उचलली . पंतप्रधान मोदी जी व भारत सरकारच्या पुढाकारातून आणि संयुक्त राष्ट्राच्या समन्वयातून २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे . आज २१ डिसेंबर २०२४ हा प्रथम ध्यान दिवस आहे व विश्वगुरु ही उपाधी जी भारत देशाला संबोधली जाते ती या माध्यमातून परत एकदा सत्यात साकारत आहे .
जवळ जवळ १३१ वर्षांपुर्वी स्वामी विवेकानंदांनी भारतीय अध्यात्म व सनातन संस्कृतीच्या परिपूर्णते बाबतीत शिकागो (अमेरीका) धर्म परिषदेत जगातील सर्व धर्म प्रमुखांना आश्वस्त केले होते . आज तोच इतिहास पुनरावृत्तीसम भासत आहे .
आपण सर्वांनी नक्की आज ध्यान करूयात .