हुर्रे ! दहावी परिक्षेचा निकाल
इयत्ता १२ वी निकाला नंतर आता इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आज संपत आहे. या विषयीची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.इयत्ता १० वी परिक्षेचा निकाल आज म्हणजे २७ मे २०२४ ला दुपारी ०१ : ०० वाजता ऑनलाईन जाहिर होणार आहे .
विवरण
शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०२४ मध्ये घेतल्या गेलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या प्रोटोकॉल नुसार जाहीर करण्यात येत आहे .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपुर , छत्रपती संभाजीनगर , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागिय मंडळाद्वारे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ १० वी) परीक्षाचा निकाल पुढे दिलेल्या संकेतस्थळांवर आज मंगळवार दि . २७ / ०५ / २०२४ रोजी दुपारी ०१ : ०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होईल .
१० वी परिक्षेचा निकाल संकेतस्थळे
१) http://mahresult.nic.in
२) http://hscresult.mkcl.org
३) http://www.mahahsscboard.in
४) http://results.digilocker.gov.in
५) http://results.targetpublications.org
आपल्या निकालाची प्रतीक्षा संपली पुढे जाण्यासाठी वरील संकेतस्थळांवर भेट द्या आणि आपल्या गुणपत्रकाची माहिती प्राप्त करा.
संबंधित विषयी विस्तृत माहितीसाठी आपापल्या विध्यालयात संपर्क करू शकता.
सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा तसेच उर्वरित विध्यार्थी मित्रांना कारण मीमांसा करत न बसता परत नव्या जोमाने तयारी साठी दमदार शुभेच्छा.