
मराठा आरक्षण
महाराष्ट्रातील सर्वात बहुसंख्य व पूर्वापार सधन असलेला मराठा समाज, ज्या मराठा समाजाने सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे व सनातन धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे कार्य केले .
मा जिजाऊंच्या शिकवणीतून परिपक्व झालेले छत्रपती शिवराय व छत्रपती शंभुराजांनी परकीय शक्तींचे हनन नसते केले तर या देशाचे आजचे अस्तित्व राहीले नसते हे आज सर्व जगमान्य आहे .
इतिहास साक्षी आहे इतरांनी सत्तेसाठी परक्यासोबत रोटी भेटीचा व्यवहार केला तेथे मराठा समाजाने कधीच लाचार भूमिका घेतली नाही वा चुकीच्या तडजोडी केल्या नाही तर उलट या पवित्र भूमीवरून त्यांना पळवून लावले .
अशा या सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणाची का आवश्यकता पडत आहे किंवा गरज का पडत आहे व अशाच काही ज्वलंत वास्तविकतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात .
पुढील काही मुद्देसूद स्पष्टीकरणावरून आरक्षणाची आवश्यकता लक्षात येईल .
शिक्षणातील मागासपण व त्याबाबतची उदासीनता .
डळमळीत आर्थिक परिस्थिती.
सामाजिक असमानता.
संधिंची ची कमतरता.
वरील सर्व मुद्दे आपापसात संबंधित आहे त्यावर एकत्रित प्रकाश टाकूयात .
मराठा समाज पूर्वीपासूनच शेती या व्यवसायावर अवलंबून असलेला होता . ज्याला पर्यायी नाव कुणबी किंवा कुणबी मराठा असे संबोधत होते . कुणबी म्हणजे शेतकरी वर्ग ज्यावेळी अस्तित्व टिकवण्याची गरज पडली त्यावेळी शस्त्र हातात घेऊन शेतकऱ्याचा सैनिक बनला म्हणजे क्षत्रियतेचे पालन करू लागला . कालांतराने युद्ध संपले, आता सैनिक म्हणून कार्य राहिले नाही करीता परत उदरनिर्वाहासाठी शेती करू लागला म्हणजे कुणबी करू लागला . शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मराठा समाजाचा होता.
पण अलीकडील म्हणजे स्वातंत्र्यानंतर लोकशाहीत विविध पक्षांच्या सत्तेच्या काळामध्ये शेतीच्या बाबत राबवल्या गेलेल्या नीती (पॉलिसीज) शेतीचा व्यवसाय म्हणून पहाता शेतीसाठी घातक ठरत गेल्या हे मुख्य कारण आहे . तसेच निसर्गाचा वारंवार लहरीपणा , शेतमालाला खर्चाच्या तुलनेत नसलेला रास्तभाव, वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से वाट्या नुसार घटक गेलेला सातबारा अशा विविध कारणांनी समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली . परिणामी शिक्षण क्षेत्रातील समाजाचे मागासपण वाढत गेले . शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात समाज मागे पडत गेला .
समाजातील काही प्रमाणात लोक सधन राहिले जे की सर्व जातीधर्मात असतातच. पण मराठा समाजाच्या बहुसंख्यतेचा विचार करता सर्वात जास्त संख्येने समाज आर्थिक व शैक्षणिक मागास होत गेला .
आरक्षण
मुळात आरक्षण बाबत आपण सर्व जाणता पण तरीही थोडी माहिती बघूयात .
आपल्या देशात सामाजिक न्यायाचा म्हणजे समाजातील विषमता जावी समाजातील सर्व घटक एक पातळीत असावेत . (जे की पूर्वी नव्हते वर्णव्यवस्थेच्या नावाखाली चुकीच्या व्याख्या केल्या गेल्या व सामाजिक विषमता वाढत गेली पण येथे जरूर नमूद करेन की इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन कार्य केले कधी जातिभेद ही संकल्पनाच पोसू दिली नाही . स्वराज्य निर्मितीमध्ये समाजातील सर्व घटक होते त्या शिवरायांचा वसा घेत मराठा समाजाने सर्व घटकांसह कार्य केले .) च्या साठी म्हणजे सामाजिक न्यायाचा उपाय म्हणून आरक्षणाची अंमलबजावणी केली गेली . दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की ऐतिहासिक दृष्ट्या वंचित दुर्बल आणि मागासवर्गीय समाज घटकांना शिक्षण नोकरी आणि राजकीय क्षेत्रात समान संधी उपलब्ध करणे . च्या साठी आरक्षण ही संकल्पना उदयाला आली .
उद्देश
वर्णधारीत जातीव्यवस्थेमध्ये झालेल्या पूर्वापारपासूनचा भेदभाव मिटवण्यासाठी , शिक्षण व नोकरीच्या संधी मधील असमानता तसेच सामाजिक व आर्थिक दुर्बलतेने मागास असलेल्या गटांना प्राधान्य देण्यासाठी देशात याला सरकारी व काही खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच शासकीय नोकरीमध्ये व राजकीय प्रतिनिधित्व लाभावे संधी मिळावी म्हणून आरक्षणाची संकल्पना साकार करण्यात आली .
याचा लाभ प्रामुख्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांना होतो हे आपण जाणता .
जात किंवा जाती
सनातन समाज रचनेतील कितीतरी शतकांपासून प्रचलित असलेली सामाजिक विभागणी म्हणजे जात अशी व्याख्या जरी असेल तरी मुख्य वर्णव्यवस्थेवरून काळानुसार अनेक जाती निर्माण झाल्या जातीव्यवस्था ही प्रामुख्याने हिंदू धर्माशी सलग्न असलेली बाब आहे उदाहरणार्थ ब्राह्मण कुणबी मराठा सोनार लोहार चांभार सारी माळी तेली इत्यादी हे सर्व धर्माशी निगडित आहे तरी सामाजिक व व्यावसायिकतेवर आधारित आहे .
जमात
नैसर्गिक व भौगोलिक संबंधित संस्कृती असलेले प्राचीन गट जे डोंगर, जंगल व दुर्गम भागात राहतात आणि निसर्ग आधारित म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार जीवन पद्धती अवलंबतात ती म्हणजे जमात उदाहरणार्थ गोंड भिल्ल कोळी इत्यादी .
एकंदरीत काय तर समाज व व्यवसायाधारित विभागणी म्हणजे जात व भौगोलिक स्थिती आधारित संस्कृती समूह म्हणजे जमात .
इतर मागासवर्गीय जात OBC
इतर मागासवर्गीय जाती म्हणजे ओबीसी बाबत आपण जर विचार केला तर भारतामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त म्हणजे 261 जातींचा कुणबीसह समावेश आहे . भारत देशाचा विचार करता अडीच हजारांच्या वर जाती व उपजातींचा समावेश ओबीसी मध्ये आहे .ही आकडेवारी व या विषयीची माहिती खात्रीलायक आहे असा दावा करत नाही म्हणजे या मध्ये तफावत असू शकते .राज्याच्या ओबीसी यादीत जाती संख्या 351 तर केंद्रीय यादीमध्ये महाराष्ट्रातून 261 जाती ग्राह्य धरल्या गेलेल्या आहेत .
कुणबी
कुणबी हा गट किंवा समाज शेती संबंधित आहे. शेतमजूर व शेतकरी यांना कुणबी म्हणून संबोधतात .
कुणबी मध्येही उपगट किंवा उपजाती आढळतात जसे की कुणबी मराठा, कुणबी देशस्थ, कुणबी लेवा म्हणजे लेवा पाटील, कुणबी भोई, कुणबी ढोकले, कुणबी हत्तीकरी आदी उपगट आढळतात .
व्याप्ती
राज्यामध्ये कुणबी समाज हा विदर्भात नागपूर भंडारा वर्धा अमरावती अकोला ; उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार ; पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा सांगली तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड येथे अधिकृत नोंदी असलेले कुणबी मराठा आढळतात .बाकी मराठा समाजाच्या नोंदी अज्ञानामुळे तसेच संबंधित यंत्रणांच्या दिरंगाईमुळे लुप्त झाल्या पण एकंदरीत सर्व मराठा समाज हा कुणबीच आहे असे म्हणायला हरकत नाही व हाच एक जबर आधार घेत श्री मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मागत आहेत . तसे पाहता समाजातील आर्थिक व शैक्षणिक मागास असलेल्या बहुसंख्यतेमुळे ही मागणी त्यांची रास्तच आहे .

काही नेते आज म्हणताहेत की राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आरक्षण मागितले जाते आहे तर असे लाभ घेणारे एखाद अर्धा टक्काही नसतील .थोडक्यात शेकडून च्या मुळे कोटींच्या संख्येने गरीब असलेला समाजाला आरक्षणाच्या लावा पासून दूर ठेवणे कितपत योग्य आहे व असा विचार मांडणारी स्वतःची बुद्धी शून्यता ही दर्शवताना दिसत आहेत .
या विषयी बरेच विस्तृत लिहिता येईल व भविष्यान परत लिहिण्याचा प्रयत्न करू .