महाराष्ट्र विधानसभा २०२४

महाराष्ट्र विधानसभा २०२४

महाराष्ट्र विधानसभा २०२४

जसे आपण जाणता अहात की हे संपूर्ण वर्ष २०२४ निवडणूकांच्या धामधूमीतच गेले . एप्रिल ते जून लोकसभा निवडणूक चालली . बाकी सर्व वर्ष नोव्हेंबर पर्यंत विविध राज्यातील विधानसभा निवडणुकी चालल्या त्या खालील प्रमाणे .

  • आंध्र प्रदेश व ओडिसा १३/०५/ २०२४ मतदान व निकाल – ०४/०६/२०२४
  • अरुणाचल प्रदेश व सिक्किम १९ एप्रिल २०२४ व निकाल २ जुन  २०२४
  • जम्मू काश्मीर १८ सप्टेंबर २0२४ व निकाल – o८ ऑक्टेंबर २०१४
  • हरियाणा ०५ ऑक्टोंबर २०२४ व निकाल ०८ ऑक्टोंबर २०२४
  • महाराष्ट्र २० नोव्हेंबर २०२४ व निकाल २३ नोव्हेंबर २०२४
  • झारखंड १३ नोव्हेंबर २०२४ व निकाल २३ नोव्हेंबर २०२४

वरिल तक्त्या नुसार येणाऱ्या २० नोव्हेंबर ला राज्यात मतदान होत आहे . गत पाच वर्षांत राजकिय घडामोडी फारच नाट्यमयी रीत्या घडत गेल्या . खालिल आकडेवारी सांगते की कोणा एकाला स्पष्ट कौल जनतेने दिलेला नव्हता .

  • २६.१ लोकमता सह भाजप १०५ आमदार
  • १६.६ लोकमता सह शिवसेना ५६ आमदार
  • १६.९ लोकमता सह राष्ट्रवादी ५४ आमदार
  • १६.१ लोकमता सह काँग्रेस ४४ आमदार
  • १०.१ लोकमता सह अपक्ष १३ आमदार
  • १४ .२ लोकमता सह इतर १६ आमदार

अशी आकडेवारी व पदांच्या ओढाताण मुळे कोणत्याही मित्रपक्षांचे सुत एकमेकांशी जुळले नाही .  असे असतांना साऱ्या राज्याने पहाटेचा शपथविधी अनुभवला, देशाने पाहिला . परत ही युती न चालल्याने दादा परत स्वगृही आले . परत नाटकिय प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस व सेना ही युती उदयाला आली . परत अंतर्गत धुसपुस कारणीभूत ठरत शिंदे सरकार या राज्याला लाभले हे सर्व घडतांना मतदार राजा नुसते बघत होता . सत्तेसाठी खुर्चीसाठी निष्ठा , नितीमत्ता , समर्पण  आदर्श वैगेरे शब्द फक्त शब्दच राहीले .

असो आपण या चालू महाराष्ट्र विधानसभा २०२४ कडे लक्ष वेधूया . या वेळी राज्यातील विधानसभा नोव्हेंबर २०२४ च्या निवडणुकित जवळपास ९ कोटी ६४ लाख 85 हजार ७६५ मतदार राज्यातील सरकार आकाराला आणणार आहेत . यामध्ये १८ ते १९ वयोगटातील २०लाख ९३लाख २०६ युवा मतदार आहेत . ६ लाख ३६हजार २८८ मतदार हे दिव्यांग आहेत . ६ हजार ०३१ तृतीयपंथी व १२लाख ४३हजार १९२ मतदार हे वय वर्षे ८५ च्या वरील आहेत .

मतदानासाठी ओळखपत्र म्हणून आधार UID, पॅन , ड्राईविंग लायसेन्स , मनरेगा जॉबकार्ड सारखे जवळ जवळ १२ प्रकारचे शासकीय विभागाद्वारे दिले जाणारे ओळखपत्र मान्य आहेत .

या वेळी राज्यामध्ये २०१९ च्या तुलनेत ३ हजार ५३३ ने अधिक म्हणजे १लाख १८६ मतदान केंद्रे आहेत .

२२ ऑक्टोंबर २०२४ च्या राजपत्रित अधिसूचनेनुसार उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख होती २९ ऑक्टो २०२४ दिनांक ३० ऑक्टो . छाननी दिवस तर उमेदवारी मागे घेण्याची तारीख होती ४ नोव्हेंबर २०२४ .

आता मतदान दिनांक आहे २० नोव्हेंबर २०२४ व मत मोजणी दिनांक आहे २३ नोव्हेंबर २०२४ . निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार ही निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पुर्ण केली जाईल .

Related Posts

वैश्विक ध्यान दिवस

संपूर्ण भारत वर्षासाठी अभिमानाची बाब व सनातन संस्कृतीची सर्वोच्च सिद्धता वैश्विक ध्यान दिवसाच्या माध्यमातून दिसत आहे . संयुक्त राष्ट्राने नुकताच २१ डिसेंबर २०२४ जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केलेला आहे…

महाराष्ट्र विधानसभा 2014 निकाल व्यापक दृष्टिकोनातून

महाराष्ट्र विधानसभा 2019 चे निकाल महाराष्ट्रातील लोकसभा निकालाच्या तुलनेत अनपेक्षित वाटत आहेत प्रत्येक पक्षाच्या विचारधारेला आव्हानात्मक निकाल म्हणावे लागतील सोबतच बऱ्याच न्यूज चॅनलचे व राजकीय भविष्य वक्त्यांचे अंदाज चुकवणारे निकाल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *