सांस्कृतिक दिपस्तंभ

सांस्कृतिक दिपस्तंभ

आदि शंकराचार्य व शिकवण
काळाची गरज

साधारणतः या सदरा दरम्यान अशा काही महान विभुति अरुणाऱ्या महात्म्यांचे जीवन अभ्यासणार आहोत की ज्यांनी धर्माची विस्कळीत झालेली घडी दुरुस्त केली व सोबतच हे ही पाहू की आज याची गरज काय ?

सांस्कृतिक दिपस्तंभ

रामकृष्ण हरी

आज आपल्या भारत देशात ज्या मध्ये विविध जीवन जगण्याच्या पद्धती (धर्म) असलेल्या तीन हजार जाती व पंचवीस हजार उपजाती, सव्वाशेच्या घरात मुख्य भाषा व पंधराशेच्यावर इतर बोली भाषा असलेल्या विविधतेने नटलेल्या अखंड भारत देशात सध्या मात्र जी काही सांस्कृतिक विषमतेने सामाजिक परिस्थिती ढवळलेली दिसत आहे . ही स्थिती अशीच बनून राहिली तर तो दिवस दूर नाही की आखातातील काही देशात ज्या प्रमाणे अराजकता आढळून येते आहे त्या प्रमाणे ज्या देशाची संस्कृति ऱ्हास पावते त्या देशांचे असेच भवितव्य असू शकते .
इतर धर्मियांचे सोडा समान जीवनशैली असलेले पंथ सांप्रदाय आज एकमत नाहीत . सनातन धर्मातील विविध शाखा विविध पंथ आज दांभिकतेने कर्मकांडाने गांजलेले स्त्रस्त झालेले आढळते आहे . सनातन जीवनशैलीचा मुळ गाभा सोडून लोक सरळ सरळ भरकटत चाललेले दिसत आहेत . वेळीच यावर विचार केला गेला नाही तर इतिहासात देशावर कितीतरी परकिय आक्रमणे होत राहिली तरीही या भारत देशाची अखंडता , एकोपा कधी भंगली नाही . मात्र वरील बाबी या देशाच्या एकीला अखंडतेला मारक ठरू शकणाऱ्या आहेत .
प्राचिन काळापासून या देशाची अखंडता टीकून आहे ती फक्त आणि फक्त समृद्ध आध्यात्मिक वारशामुळे .

सांस्कृतिक दिपस्तंभ

सांस्कृतिक दिपस्तंभ

मित्रांनो हा आध्यात्मिक वारसा सांस्कृतिक ठेवा असाच आपल्या पर्यंत पोचलेला नाही . या साठी श्रीमद् भगवद्गीता अध्याय ४था श्लोक ७ व ८ मध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे, “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।। ”
अर्थात, ‘जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल धर्माची घडी विस्कटेल त्या त्या वेळी मी ती विस्कटलेली घडी व्यवस्थित करेन . ‘ च्या नुसार विविध कार्यकाळात वेगवेगळ्या महात्म्यांनी ही विस्कटलेली घडी परत परत ठीक केलेली आहे . भगवान कृष्णा नंतर प्रामुख्याने २२०० वर्षांपूर्वी आदिशंकराचार्यांनी हे महान कार्य त्यांना लाभलेल्या अल्पायुष्यात केले व सनातन संस्कृती समृद्ध केली . तदनंतर गोरक्षनाथ , माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरां सोबत विविध साधू संत महात्मे व अलिकडे थोड वेगळे उदा० श्रील प्रभुपाद आहेत तसेच श्री श्री रविशंकर जी या सर्वांना विसरून चालणार नाही .
प्रत्येकांच्या जीवनाचा कार्यकाळ कर्म व शिकवणी यावर टप्प्याटप्प्याने ‘ सांस्कृतिक दिपस्तंभ ‘ या सदराच्या माध्यमातून प्रकाश टाकूयात पण प्रथम आज आदि शंकराचार्यांची जीवनी वर नजर फिरवूयात .

आदि शंकराचार्य यांचा कार्यकाळ २२०० वर्षांपूर्वीचा आहे त्या वेळेस चे त्यांच्या विषयीचे तत्कालिक लिखाण आढळत नाही पण त्यांच्या फार नंतर त्यांच्या वर बरेचसे साहित्य लिहिले गेले व जात आहे . थोडक्यात शंकराचार्यांची जीवनी बाबत ऐकिवात माहितीवर लिखाण झाले हे आपण नाकारू शकत नाही .

केरळ मधिल कालडी गावातील नंबुद्री घराण्यातील आर्यांबा व शीवगुरू नामक जोडप्याला लग्नानंतर बरीच वर्षे आपत्य झाले नव्हते . बरेचसे उपाय करून थकल्यावर त्यांनी त्रिशिवपुरम (त्रिचूर) येथिल भगवान शंकर वड्डकनाथाला ४० दिवस प्रार्थना केली . नंतर कालडी गावी आल्यानंतर त्यांना स्वप्नात साकात्कार झाला की, ‘ तुम्हाला सर्वज्ञान संपन्न मुलगा होईल पण तो अल्पायुषी असेल, किंवा दिर्घायु संतान हवी असेल तर ती मंतीमंद असेल . ‘ यावर शिवगुरू स्वतःशास्त्र संपन्न असल्यामुळे त्यांनी प्रतिभावान मुलाची अपेक्षा केली .
शंकराचार्यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे अर्नाकुलम जवळील वेलियानाड गावातील मेरपाळू भागात झाला . शंकराचार्यांच्या जन्मानंतर सर्वांच्याच लक्षात आले की जन्माला आलेले बाळ प्रतिभावान व पुर्वजन्मीचा ज्ञानाचा वारसा घेऊन आलेले आहे . शंकराचार्यांच्या जन्मानंतर तीन वर्षातच त्यांच्या वडिलांचे वृद्धत्वामुळे निर्वाण झाले . साधारणतः मुल आठ वर्षांचे झाल्यावर उपनयन केले जाते मात्र बालकाची ओजस्वीता पाहून पाचव्या वर्षीच मौंजीबंधन करवले . नंतर नात्यातीलच शिक्षक असलेल्या व कालडी गावा जवळील एका गुरुकूल मध्ये पुढील शिक्षण पुर्ण केले .

कनकधारा स्तोत्र

ज्यावेळेस शंकराचार्य शिष्यावस्थेत गुरुकुल मध्ये शिकत होते त्यावेळी तेथे भिक्षा मागून विद्यार्थ्यांना जेवायला मिळायचे . एके दिवशी शंकराचार्य भिक्षेसाठी एका गरीब बाईच्या दारात गेले व भिक्षेसाठी याचना केली . ती बाई फार गरीब होती व तिची त्यांना काहीतरी देण्याची इच्छा होती पण त्यासाठी तीन असमर्थ होती म्हणून तिने बाजूला असलेल्या आवळ्याच्या झाडाखाली वाळलेला आवळा आचार्यांच्या हातावर ठेवला . तो आवळा पाहून शंकराचार्यांनी तेथेच एक महालक्ष्मीचे स्तोत्र स्तुती रूपाने गायले व त्यामध्ये याचना केली की मी सर्व जगामध्ये सर्वांपेक्षा गरीब आहे माता तू माझ्यावर कृपा कर देवीने प्रसन्न होऊन तेथे तात्काळ सोन्याच्या आवळ्याचा पाऊस पाडला म्हणून त्या स्तोत्राला कनकधारा स्तोत्र असे नाव पडले .

आभ्यास पुर्ण झाल्यानंतर गुरुकुलमधील गुरुजनांनी त्यांना सांगितलं की आम्ही सर्व शिक्षण आपणास दिले आहे आता आपण घरी जाऊ शकता . वैराग्य वृत्तीने शंकराचार्यांचे मन घरी लागत नव्हते . शंकराचार्यांना सदगुरूंची आस लागली होती . तत्पुर्वी सन्यास घेणे ही आवश्यक होते , पण आई आर्यांबा त्यांना परवानगी देत नव्हती . आईच्या अनुमोदनाशिवाय संन्यास घेणे शास्त्राला धरून नाही . एके दिवशी शंकराचार्य नदीत आंघोळीसाठी उतरलेले असतांना मगरीने त्यांचा पाय धरला . ही गोष्ट माता आर्यांबाला समजली , ती धावत त्या स्थळी आली असता शकराचार्यांनी विनंती केली की हे माते मी शेवटच्या घटके जवळ आहे आता तरी मला ब्रम्हचर्यातून संन्यास स्विकारण्याची परवानगी दे . परिस्थिती पाहून आई ने परवानगी दिली . त्या क्षणी मगरीने त्यांचा पाय सोडून दिला . कालडी गावी आजही मकर घाट बघण्या साठी लोक जातात . या व अशा अनेक घटना शकराचार्यांच्या जीवनातील अनाकलनीय आहेत .

सद्गुरूंची आस तर लागली होतीच , नंतर काही दिवसांनी त्रिवेंद्रम ला पद्मनाभम च्या दर्शनासाठी काही लोक दिंडी स्वरूपात चालले असतांना यांच्या कालडी गावी थांबले होते त्यात एक वृद्ध गृहस्थास शंकराचार्यांनी घरी नेऊन त्यांना जेऊ घातले . त्या वृद्ध महात्म्याने शंकराचार्यांकडे बघून सांगितले की अरे तुम्ही येथे काय करता अहात ? तुमचे सद्गुरू तिकडे नर्मदे शेजारी ओंकरेश्वरला वाट पहात आहेत . बस मग काय क्षणाचाही वेळ न दवडता वयाच्या आठव्या वर्षी आईच्या सहमती ने व आई च्या शेवटच्या क्षणाला भेट घेण्याच्या वचनावर ते सरळ विष्णु नामक मित्रासह सद्गुरू भेटी साठी घरून निघाले.

सद्गुरू भेट

सद्गुरुंच्या भेटी ची उत्कंठा त्यांना कोठेच रोखू शकत नव्हती . मजल दर मजल करत त्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांसह ओंकारेश्वरला पोहचले . गुरु गोविंदपाद यांच्या समोर पोचल्यावर गुरुंनी प्रश्न विचारला की, ” कस्त्वं? ” म्हणजे कोण तू ? तेंव्हा शकराचार्यांनी लगेच तेथे परिचय देताना पुढील स्तोत्र उच्चारले .

‘मनो बुध्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे ।

न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

न च प्राण संज्ञो न वैपंचवायुः
न वा सप्तधातुर्न वा पंचकोशाः ।
नवाक्पाणि पादौ न चोपस्थ पायू
चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्धो न कामो न मोक्षः
चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

न मृत्युर्न शंका न मे जाति भेदः
पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

अहं निर्विकल्पो निराकार रूपो
विभूत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणाम् ।
न चासंगतं नैव मुक्तिर्न मेयः [न वा बंधनं नैव मुक्तिर्न बंधः]
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

दिलेल्या उत्तरावरून शंकराचार्यांची प्रतिभा गोविंदपाद यांच्या लगेच लक्षात आली की हे काही साधारण बालक नाही . त्यांनी लगेच शकराचार्यांना शिष्य म्हणून स्विकारले .

नर्मदाष्टक

गोविंदपाद यांना महर्षी पतंजली यांचे अंशावतार मानले जाते . ते सतत ध्यानस्थ अवस्थेत असायचे . एकदा असेच ध्यान अवस्थेत असताना गुहेमध्ये जी गुहा नर्मदेच्या किनाऱ्यावर किती होती ती मध्ये नर्मदेला भरपूर पाणी आले व ते पाणी गुहेत जाण्याची भीती निर्माण झाली गुहेमध्ये गुरु गोविंदपाद ध्यानावस्थेत बसलेले असल्याने सर्व शिष्य चिंता करू लागले सर्व शिष्य शंकराचार्यांकडे या विषयी गेले असता शंकराचार्यांनी नर्मदेची स्तुती व विनंती केली की हे नर्मदा माता माझे गुरू या गुहेत ध्यानावस्थेत आहेत व आपण आत जाऊ नये नसता त्यांचे ध्यान भंगल्याने प्रायश्चित करावे लागेल . असे म्हणतात की नंतर नर्मदा माता शांत झाली . नंतर हा सर्व प्रकार गोविंदपाद यांना समजला त्यावेळी ते विस्मित झाले . त्यांनी लवकरच शंकराचार्य यांना सांगितले की तुम्हाला जे काही आवश्यक होते ते सर्व आता तुमच्या कडे आहे आता तुम्ही धर्म कार्यार्थ अद्वैत वेदांताच्या प्रचार प्रसारार्थ जाऊ शकता . तुम्ही काशी ला जा

काशी

गौडपाद यांच्या आशेनुसार शंकराचार्य काशी कडे निघाले ओंकारेश्वर पासून काशी कडे जाताना प्रवासामध्ये जेथे जेथे थांबत गेले ते तिथे वेदांताचे प्रवचन देत जात होते यामुळे त्यांच्यासोबत काशीपर्यंत जाऊ पर्यंत बराच मोठा शिष्य परिवार वाढला होता काशीमध्ये दशाश्वमेध घाट ला ते थांबले .

वेदव्यास

शंकराचार्य व त्यांचा शिष्य परिवार काशी मध्ये असतांना एकेदिवशी एक काळी भेसूर व्यक्ती तेथे आली व तुमचे आचार्य कोठे आहेत मला त्यांच्या सोबत शास्त्रार्थ करायचा आहे . त्या काळी शास्त्रार्थास आहे कोणी अवाहन केले तर नकार देणे ही पण एक हार मानली जायची . शंकराचार्य व ती व्यक्ती यांच्या मध्ये ब्रम्ह सुत्र यातिल उत्क्रमण शास्त्रावर अठरा दिवस शास्त्रार्थ चालला . सगळी कडे याची चर्चा झाली शेवटी ती व्यक्ती जे की स्वःत वेद व्यास होते प्रसन्न होऊन शंकराचार्यांना त्यांनी अशिर्वाद दिला व त्यांना सांगितले की तुम्ही संपूर्ण भारत वर्ष फिरून सनातन धर्माची विस्कटलेली घडी दुरुस्त करावी . जे जे लोक फक्त कर्मकांडांना मानतात, ज्ञानाला मानत नाहीत व अद्वैताला मानत नाहीत तसेच जैन , बौद्ध व इतर पाखंडी मतांचे खंडन अद्वैत वेदांताचे मंडण करावे . आता वेळ आलेली आहे की सनातन धर्माच्या विचारधारेपासून जो समाज दूर जात आहे त्यांना परत आपल्या योग्य वाटेवर आणावे . प्रथम प्रयागराजला मिमांसक कुमारील भट्ट यांना भेटावे . आणि वेद व्यासांनी प्रसन्न होत त्यांचे वय १६ वर्ष आणखी वाढवले किंवा असेही म्हणून शकतो की धर्माच्या वाटेवर कार्य करत असतांना मनुष्याचे आयुष्य ही वाढते .

मिमांसक कुमारील भट्ट

शंकराचार्य व त्यांचे शिष्य प्रयागराज ला कुमारीलभट्ट यांच्या भेटीला गेले . तेंव्हा तेथे त्यांच्या नावाचा फार बोल बाला होता . म्हणजे के फार बडे प्रस्थ होते असे म्हणू . कथाकार यांच्या विषयी एक कथा सांगतात की कुमारील भट्ट हे एकदा भिक्षा मागण्यासाठी एका घरी गेले असता त्या घरातील बाई गच्चीवरून त्यांना म्हणाली की मी वरून भिक्षा वाढते आपण ती स्विकारा . आता न पटणारी गोष्ट आहे की वरून टाकलेली भिक्षा कशी घेणार . याचे कारण विचारले असता ती माऊली म्हणाली की मी खाली येऊन वाढली असती पण माझा धर्म भ्रष्ट होण्याची भीती वाटते . त्या काळात भारत देशात बौद्ध मतांचे प्रस्थ फार वाढलेले होते , कोणी बौद्ध भिकु च्या सावलीला उभे राहीले तर धर्म भ्रष्ट होण्याची भीती वाटायची . हा सर्व प्रकार अनुभवल्यानंतर कुमारील भट्टांनी संकल्प केला की मी बौद्ध मतांचे खंडन करणार . म्हणून त्यांनी प्रथम बौध्द मत जाणून घेण्यासाठी ओळख लपवून बौद्ध मठात शिरकाव केला . सर्व मत जाणून घेतल्यावर परत स्वधर्मात येऊन बौध्द धर्मातील कमकुवत बाजू धरून बऱ्याच बौध्द धर्म गुरुंच्या नाकी नऊ आणले . बऱ्याच भिखूंना शास्त्रार्थात हरवले . हे सर्व बौद्ध धर्म गुरुंच्या लक्षात आले म्हणून त्यांनी भावनिक करत त्यांना जाण करवून दिली की तुम्ही ज्या धर्माचे (सनातन) प्रतिनिधित्व करतात त्या धर्मामध्ये गुरुद्रोह मोठे पाप आहे . व आम्ही आपले गुरूच आहोत . मग तुम्ही आमच्याशी द्रोह करणे कितपत ठीक आहे . कुमारील भट्टांना जेव्हा याची जाण झाली तेव्हा प्रायश्चित म्हणून अग्निप्रवेश स्विकारला . नेमके अशावेळी शंकराचार्य यांच्या शिष्यांसह तेथे पोचले त्यांना सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला कुमारील भट्ट शंकराचार्यांना म्हणाले की माझी येथील वेळ संपली आहे . आता तुम्ही माझ्या शिष्याला जो माहिष्मती नगरीमध्ये मंडल मिश्र या नावाने वास्तव करत आहे त्याला भेटा .

मंडण मिश्र ( सुरेश्वराचार्य )

काशीवरून शंकराचार्य महेश मती नगरीमध्ये मंडन मिश्र यांना विचारत त्यांच्या घरी पोहोचले तेथे शंकराचार्यांनी त्यांना शास्त्रार्थसाठी विचारणा केली मग मंडनमिश्र यांनी शास्त्रार्थाचे आव्हान स्वीकारले . शास्त्रार्था मध्ये कोणीतरी एक न्याय देणारा जाणकार असावा म्हणून त्यांनी मंडनमिश्र यांची पत्नी उभयभारती हिची निवड केली व अशी अट घातली की जर मंडनमिश्र शास्त्रार्थ हरले तर त्यांनी अद्वैत वेदांताला स्वीकारावे व शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करावे व जर शंकराचार्य हरले तर त्यांनी मंडनमिश्र यांचे दास्यत्व स्वीकारावे . शास्त्रार्थामध्ये मंडनमिश्र यांनी नंतर स्वतःची हार स्वीकारली . परंतु त्यांची पत्नी उभयभारती हिने शंकराचार्यांना आवाहन केले की मी त्यांची अर्धांगिनी असल्यामुळे मलाही शास्त्रार्थात हरवावे तरच मंडनमिश्र यांची हार स्वीकारली जाईल असे असल्याने शंकराचार्यांनी हे पण आवाहन स्वीकारले . मंडनमिश्र यांची पत्नी उभय भारती ने शास्त्रार्थ करताना शंकराचार्यांना असे काही प्रश्न विचारले की ज्याचे उत्तर एक ब्रह्मचारी अनुभवाशिवाय देऊ शकत नव्हता म्हणून शंकराचार्यांनी या समाधानासाठी एक महिना वेळ मागितला व शिष्यांना स्वतःचा देह सांभाळण्यासाठी उचित सूचना देऊन परकाया प्रवेश करून एका विलासी राजाच्या देहामध्ये जाऊन सगळ्या गोष्टी अनुभवल्या व एक महिन्यानंतर परत आले . उभय भारती काय समजायचे ती समजून गेली होती त्यामुळे उत्तर ऐकण्याचे औचित्य रहात नव्हते म्हणून तिनेही हार स्वीकार केली . प्रथम ठरल्यानुसार मंडनमिश्र यांनी शंकराचार्यांचे शिष्यत्व स्विकारले, नंतर त्यांचे नाव सुरेश्वराचार्य असे ठेवण्यात आले जे की शृंगेरी मठ कर्नाटक मधील पहिले मठाधिपती झाले .

शंकराचार्यांचे आणखी तीन मुख्य शिष्य होते . पद्मपादाचार्य , हस्तामलकाचार्य व त्रोटकाचार्य

पद्मपादाचार्य

पद्मपादाचार्यां विषयी माहिती आढळते की ते भगवान नृसिंह चे अंश होत म्हणजे रौद्ररूप धारण करणारे . जेव्हा एका भैरवाने कपटतेने शंकराचार्यांना म्हणाले की आपण तर अमर अहात मग मी आपल्या शरीराचा बळी देऊ का ? शंकराचार्य निरागसतेने कबूल झाले व ध्यानावस्थेत गेले त्यांना मारण्यास जेंव्हा भैरव आला तेव्हा पद्मपादाचार्यांनी त्याचा बीमोड केला . यांना पुरी म्हणजेच गोवर्धन मठावर अधिपती बनवले .

हस्तामलकाचार्य

एक बालक घरी कधीच बोलत नव्हता म्हणून त्याला शंकराचार्यांकडे आणले . शंकराचार्यांनी त्याचे नाव विचारले असता त्या बालकाने सुंदर व स्पष्ट असा काव्य रूपाने स्वतः चा परिचय दिला . त्याची ओजस्विता ओळखून शंकराचार्य म्हणाले की हा पुर्वजन्मी पासूनचे ज्ञान घेऊन आलेला व ज्ञानाला तळहातावरील आवळ्या प्रमाणे स्पष्ट करणारा असाधारण आहे , म्हणून त्यांचे नाव हस्तामलकाचार्य पडले . यांना द्वारका मठावर अधिपती म्हणून स्थापले .

त्रोटकाचार्य

शंकराचार्यांच्या शिष्यांपैकी गीरी म्हणून एक मंद बुद्धी असल्यासारखा शिष्य होता . एके दिवशी सर्व शिष्य प्रवचनाला येऊन बसले असताना गिरी हजर नव्हता शंकराचार्यांनी त्याबाबत विचारणा केली असता बाकी शिष्य म्हणाले की गुरुदेव आपण सुरू करा कारण असेही गिरी मंदबुद्धी आहे त्याला कोठे प्रवचन लक्षात येईल . त्यावेळेस गिरी आचार्यांचे कपडे नदीवर दूध होता तेथे त्याला काहीतरी संचारले असा भास झाला व तो पळत गुरुदेवांच्या चरणी येऊन थांबला व गुरूंची स्तुती स्तोत्र रूपाने गायली . त्रोटकवृत्तामध्ये ( संस्कृत रचना पद्धति ) स्तोत्र गायल्यामुळे त्यांचे नाव त्रोटकाचार्य असे आचार्यांनी दिले आहे . त्रोटकाचार्यांना जोतिर्मठ उत्तर भाग ला मठाधिपती बनवले .

अशा प्रकारे त्यांनी पुर्ण भारत वर्ष जेथे जेथे पाखंड वा चुकिच्या गोष्टी होत्या त्यांचे खंडन करत चारही दिशांनी मठ निर्माण करून वेदांधारीत सनातन धर्माला सुरक्षित केले . व नंतर काश्मिर ला सर्वज्ञ मठाची निर्मिती केली . त्यावर काही काळ तेथेच वास्तव्य केले . या सर्व कार्याच्या दरम्यान त्यांनी तीन वेळा भारत भ्रमण केले . तिसऱ्या वेळी त्यांना अंतर्शानाने आईचा संदेश मिळाला की आई आता निर्वाण अवस्थेत आहे , आईला त्यांनी शब्द दिला होता की मी वेळीच हजर नक्की होईल त्या वचनानुसार ते कालडी गावी आले व आईला भेटले .

कृष्णाष्टक

आईची अंतिम इच्छा होती की कृष्ण भेट व्हावी म्हणून शकराचार्यांनी आईसाठी कृष्णाष्टक रचले व आईला मोक्ष प्राप्त झाला . आजही कालडी गावी पुर्णा नदी शेजारी ते कृष्णमंदिर आहे .

गरज

ज्याप्रमाणे आजही विविध पंथ संप्रदाय समाजाला मूलधर्मापासून दूर नेत आहे जगातील सर्वात उच्च तत्त्वज्ञान असणाऱ्या वेदांपासून दूर नेणाऱ्या दूर नेऊ पाहणाऱ्या दाभिक पाखंडी धर्म मार्तंडांचे पेव फुटलेले आहे यालाच धर्मावर ग्लाणी येणे म्हणणे चुकीचे नसणार आहे . प्राचीन शिकवणीचा मूळ वेद धर्माचा सनातन गाभा आपण जर विसरून इतर मार्ग क्रमत असू तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला आपल्या फोटोवर छी थू करतील . आपल्या संस्कृतीचे रक्षण समाजात भोंदूगिरी पसरवणाऱ्या भांड लोकां पासून करणे गरजेचे आहे कर्मकांडाच्या नावावर काहीही चुकीच्या गोष्टी समाजात पसरवल्या जात आहेत . या सर्व परिस्थितीवर समाधान म्हणजे आदी शंकराचार्यांची शिकवण होय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जैन व बौद्ध धर्मांकडे ओघाने जाणाऱ्या समाजाला आपल्या मूल धर्माकडे थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला प्रत्येक ग्रंथावर भाष्य करून ते ज्ञान जसे आहे तसे समाजापुढे मांडले . आज खरोखर त्यांच्या शिकवणीची विचारधारेची गरज आहे .

Related Posts

वैश्विक ध्यान दिवस

संपूर्ण भारत वर्षासाठी अभिमानाची बाब व सनातन संस्कृतीची सर्वोच्च सिद्धता वैश्विक ध्यान दिवसाच्या माध्यमातून दिसत आहे . संयुक्त राष्ट्राने नुकताच २१ डिसेंबर २०२४ जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केलेला आहे…

Thin And Flexible Batteries , Innovation Of Batteries , अतुलनिय पातळ व लवचिक बॅटरीज

Innovation Of Batteries

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *