GENERAL ELECTION 2024 निवडणूक २०२४ व मतदार

GENERAL ELECTION 2024 निवडणूक २०२४ व मतदार

GENERAL ELECTION 2024 निवडणूक २०२४ व मतदार
general election 2024

सध्या देशात निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्या निमित्ताने GENERAL ELECTION 2024 निवडणूक २०२४ व मतदार या विषयीची संबधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी करिता या लेखाचे प्रयोजन करत आहोत. दानांचे प्रकार जे की श्रेष्ठ मानले जातात ते बरेच आहेत , रक्तदान , ज्ञानदान , अन्नदान वैगेरे पैकी प्रजासत्ताक देशांमध्ये मतदान हे एक श्रेष्ठ व जेष्ठ दान आहे . पण मतदानाच्या या प्रक्रिये वा पद्धती मध्ये काही जमेच्या तर काही कमकुवत बाजू देखिल आहेत . यावर थोडे मंथन …. यावेळी म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या मतदारांची ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंतची संख्या आहे ९६,८८,२१,९९४. मात्र स्वःत निवडणूक आयोगाने या संख्येच्या सत्यतेवर स्पष्ठता दिलेली नाही तो भाग वेगळा . हे व पुढील आकडे इलेक्शन कमिशन च्या अधिकृत संकेतस्थळ सर्च करतांना आढळतात .

या महायज्ञात १८-१९ व २० ते २९ वयोगटातील २ कोटी पेक्षा अधिक युवा मतदार सहभागी होत आहेत . एकूण म्हणजे  शहाण्णव कोटी अठ्ठ्याएंशी लाख एकवीस हजार नऊशे चौऱ्यांनव पैकी पुरुष मतदार आहेत ४९,७२,३१,९९४ व महिला मतदार आहेत ४७,१५,४१,८८८ व ४८०४४ थर्ड जेन्डर मतदार आहेत . तसेच ८८,३५,४४९ दिव्यांग मतदार आहेत . १८-१९ वयोगट चे १,८४,८१,६१० मतदार आहेत . २० ते २९ वयोगटातील मतदार आहेत १९,७४,३७,१६० . वृद्ध मतदारांची संख्या लक्षात घेता ८०+ ची संख्या आहे १,८५,९२,९१८. व १००+ ची संख्या आहे २,३८,७९१. यामध्ये मतदार लोकसंख्या रेशो आहे ६६.७६% व जेन्डर रेशो आहे ९४८ .

यावेळी मतदानाचे ७ टप्पे होत आहेत . दिनांक १९ एप्रिल २०२४ पहिला तर १ जून २०२४ ला शेवटचा ( ७वा ) टप्पा होत आहे व ४ जुन मतमोजणी होणार आहे .

दिनांक १९ एप्रिल २०२४ चा पहिला टप्पा २१ राज्यातील १०२ जागांसाठी होत आहे .
दिनांक २६ एप्रिल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यातील ८९ जागांसाठी मतदान होत आहे .
दिनांक ०७ मे २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यातील ९४ जागांसाठी मतदान होत आहे .
दिनांक १३ मे २०२४ च्या  चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ जागांसाठी मतदान होत आहे .
दिनांक २० मे २०२४ च्या पाचव्या टप्प्यात ०८ राज्यातील ४९ जागांसाठी मतदान होत आहे .
दिनांक २५ मे २०२४ च्या  सहाव्या टप्प्यात ०७ राज्यातील ५७ जागांसाठी मतदान होत आहे .
दिनांक ०१ जुन २०२४ च्या  सातव्या व शेवटच्या टप्प्यात ०८ राज्यातील ५७ जागांसाठी मतदान होत आहे .
५४३ जागांसाठी होत असलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये प्राथमिक माहिती नुसार १८६०५ फॉर्म आले पैकी १२८३२ स्विकृत ४६९८ अस्विकृत तर १०७५ विड्रॉल म्हणजे काढले गेले .

उद्ग्म संकेतस्थळ https://www.eci.gov.in/

GENERAL ELECTION 2024 निवडणूक २०२४ व मतदार
मतदान करा व आदर्श नागरिकत्व दर्शवा

GENERAL ELECTION 2024 निवडणूक २०२४ व मतदार; मतदान मुद्दे (आवश्यक व वास्तव)

निवडणूका म्हणजे प्रचाराची रणधुमाळी असते सत्ताधारी विरोधक पक्षिय अपक्ष सर्व एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात . हे करत असतांना पुर्वी सामाजिक सलोखा राखत व आदर राखत या गोष्टी होत होत्या मात्र या चालू निवडणुकीच्या प्रचारात फार खालच्या स्तरावर आरोप प्रत्यारोप झाले . महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात तर पक्षिय निष्ठा पार धुळीला मिळाल्या . ज्या पक्षावर मोठी झालेली मंडळी त्या पक्षाचे लचके तोडतांना माणसाने किती महत्वकांक्षी असावे याचा विचार न केलेला बरा असे झाले . किंवा त्यांची काही मजबुरी असू शकते . हा विषय परत कधीतरी .

प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये मुलभुत गरंजांधारित (इन्फ्रास्ट्रक्चर) मुद्दे असणे अपेक्षित व गरजेचे आहे . जसे की राशन , पक्की घरे, पिण्यायोग्य पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षा, अंतरबाह्य सुरक्षा वैगेरे मुद्दे असत मात्र या निवडणूकीत हे विषय जवळजवळ गौणच आहेत असे वाटते आहे जे की आवश्यक मुद्दे आहेत. वास्तवात या वेळी धर्म जात पंथ यावर आधारीत मुद्दे या निवडणुकीच्या प्रचारात आढळत आहेत . राज्यात काही भागात गुण्यागोविंदाने नांदत असलेले समाज जतियतेचे मुद्दे घेऊन बसलेले दिसत आहेत . या सर्वांना जबाबदार सत्ताधारी वा विरोधी पक्ष नसून साक्षर असुनही डोळ्यांवर विविध म्हणजे धर्म जात पंथ मी माझं मला अशा पट्टया चढवून बसलेला मतदार आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही .

राज्यातील व देशातील विविध पक्ष जनता ज्या बाबींना महत्त्व देते त्या विषयी पेरणी करतांना दिसतात . देवाच्या धर्माच्या नावावर मतांची भीक मागण्याची वेळ मतदारांनी आणली .

मुलभुत गरजांवर बाजू लाऊन धरणारे कमी व देव धर्म यांना महत्व देणारे जास्त संख्येने झाल्याने हे चित्र तयार होत आहे . विरोधक निवडणूकी पुर्वी शेतकरी आंदोलन , मणीपूर , शेजारील देश संबंध , बेरोजगारी सारख्या विषयांवर बोलत होते मात्र निवडणुका सुरू झाल्यावर हे मुद्दे कमी व आरोप प्रत्यारोपच पहाण्यास मिळाले . या वेळेस संबंध नसलेले मुद्दे व संबंध नसलेले उमेद्वार निवडणुकित पर्यायाला आले . परिसरातील मुद्दयांशी एकरूप नसलेले एजेंडे व उमेद्वार बऱ्याच ठिकाणी आढळले .

GENERAL ELECTION 2024 निवडणूक २०२४ व मतदार; मतदार (सुज्ञ व असंमजस)

मतदान करतांना सगळेच मतदार डोळस व समंजसपणे मतदान करतात असे नाही . सुज्ञ मतदाता सर्वांगाने विचार करून उमेद्वार निवडतो . मात्र काही मतदार असे ही अढळतात की त्यांनी कोणाला व का मतदान केले हे कळतही नाही आणि तसे करण्याचे स्पष्टिकरण ही ते देउ शकत नाहीत . पैसे वैगेरे अमिष घेऊन मतदान करणारा टक्काही वाढत चालला आहे . अशा मतदारांमुळे किती प्रमाणात निकाल प्रभावित होतो तो भाग वेगळा . बाकी हे प्रकार ऐकिवात आहेत त्या मुळे यावर ठाम काही व्यक्त होता येत नाही . या मध्ये आणखी एक तिसरा वर्ग आहे जो मतदानच करत नाही व यामुळे निकाल नक्की प्रभावित होतो . मतदान न करणारे व असंमजस मतदारांमुळे मतांचे जातिय ध्रुविकरण करणारे , भ्रष्ट व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेद्वार निवडून येतात हे मान्य करावेच लागेल .

प्रजासत्ताक पद्धतीमध्ये सामान्य माणूस ( कॉमनमॅन ) आपल्यावर राज्यकर्ता कसला असावा किंवा कोणी आपल्यासाठी चांगली वाईट निती राबवावी हे ठरवण्याचा अधिकार प्राप्त होतो ही लोकशाहीची जमेची बाजू आहे . तर आळशी व बेफिकीर मतदारांमुळे चुकीचे लोक निवडले जाऊ शकतात ही लोकशाहीची कमकुवत बाजू आहे . लोक दुकानात रुमाल किंवा दाताचा ब्रश घेताना चॉईस पहातो व मतदान करतांना आंधळी भुमिका घेतो म्हणजे धर्म जात पंथ समाज याला प्राधान्य दिले जाते ही कमकुवत बाजू आहे . साक्षर , समजदार व सजग मतदाराचा टक्का जोवर वाढत नाही तोवर दुरदर्शी , समजदार , शिक्षित व सर्वांगाने युक्त पुढारी निवडले जाणार नाहीत . कासवाच्या गतीने का होईना समाजात साक्षरता वाढल्याने लोकशाहीच्या या कमकुवत बाजू नष्ट होतील यात शंका नाही .

FAQ

१) भारतात लोकसभेच्या किती जागा आहेत?
Ans) भारतात लोकसभेच्या ५४३ जागा आहेत.
२) लोकसभेत सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा लागतात?
Ans) लोकसभेत सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागा लागतात.
क्रमश:
त. टी . वरील लेखातील आकडेवारी बद्दल आम्ही आग्रही नाही आहोत .

Related Posts

वैश्विक ध्यान दिवस

संपूर्ण भारत वर्षासाठी अभिमानाची बाब व सनातन संस्कृतीची सर्वोच्च सिद्धता वैश्विक ध्यान दिवसाच्या माध्यमातून दिसत आहे . संयुक्त राष्ट्राने नुकताच २१ डिसेंबर २०२४ जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केलेला आहे…

Thin And Flexible Batteries , Innovation Of Batteries , अतुलनिय पातळ व लवचिक बॅटरीज

Innovation Of Batteries

One thought on “GENERAL ELECTION 2024 निवडणूक २०२४ व मतदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *